जेरूसलेम -इस्रायली लष्कराने गाझामध्ये आणखी एक मोठा हवाई हल्ला केला. मध्य गाझा येथील देर अल-बालाह येथील शाळेवर इस्रायली हल्ल्यात किमान ३० पॅलेस्टिनी ठार झाले असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत,अशी माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने हमास कमांड सेंटरला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे.गाझा आरोग्य मंत्रालय आणि हमास संचालित राज्य माध्यम कार्यालयाने देर अल-बालाह येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या किमान ३० असल्याची सांगितले आहे. ज्या भागात हा हल्ला झाला तो भाग विस्थापित कुटुंबांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागांपैकी एक आहे.