नवी दिल्ली – सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार आहे. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. भक्तीच्या या महापुराचे अवकाशातून दिसणाऱे विलोभनीय छायाचित्रे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने सोशल मीडियावर शेअर केली आहेत.अवकाशात स्थापित असलेल्या उपग्रहांवरील उच्च दर्जाच्या कॅमेर्याने टिपलेली ही दृष्ये टेंट सिटी, पांटून पूल आणि त्रिवेणी संगम आदिंचे दर्शन घडवणारी आहेत.
इस्त्रोने अवकाशातून टिपली कुंभमेळ्याची छायाचित्रे
