नवी मुंबई – नवी मुंबईतील खारघरमध्ये उभारण्यात आलेल्या इस्कॉनच्या भव्य मंदिराचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ९ एकरच्या विस्तीर्ण भूखंडावरील हे मंदिर आशिया खंडातील इस्कॉनचे दुसरे सर्वात मोठे मंदिर आहे.श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. भगवान श्रीकृष्णाच्या या मंदिराचा उद्घाटनपूर्व सोहळा ९ जानेवारीपासून सुरू झाला आहे. १५ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर हा सोहळा संपन्न होणार आहे.या मंदिराचे बांधकाम मागील १२ वर्षांपासून सुरू होते. आता ते पूर्ण झाले आहे.मंदिराच्या उद्घाटनपूर्व सोहळ्यात विशेष धार्मिक कार्यक्रम आणि यज्ञविधी पार पाडले जात आहेत,मंदिराच्या उद्घाटनाबरोबरच पंतप्रधान मोदी या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र आणि वैदिक संग्रहालयाची पायाभरणीही करणार आहेत.
इस्कॉन मंदिराचे उद्घाटन मोदी उद्या नवी मुंबईत
