श्रीनगर – इस्कॉन संस्थेला जम्मू काश्मीर मध्ये मंदिर उभारायचे असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवानगीची वाट पाहिली जात आहे. नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते खारघर येथली इस्कॉन मंदिराचे उद्घाटन झाले त्यावेळी त्यांच्याकडे ही विनंती करण्यात आली आहे.इस्कॉनचे विश्वस्त आणि अध्यक्ष सुरदास यांनी ही विनंती केली आहे. ते म्हणाले की, माझे या बाबतीत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी बोलणे झाले आहे. ज्या प्रमाणे इतर धर्मांसाठी जागा दिली जाते त्यानुसार आम्हालाही देण्यात यावी. इस्कॉनची मंदिरे रशिया, पाकिस्तान, बांगलादेश सारख्या देशात आहेत. तर जम्मू काश्मीरमध्ये का नसावे? या ठिकाणी आम्ही उत्तम भोजन, राहण्याची व्यवस्था व धार्मिक मार्गदर्शन करणार असून हे मंदिर सर्व जातींसाठी खुले राहणार आहे. पंतप्रधानांनी जम्मू मध्ये मंदिर उभारण्याची सूचना केली होती. मात्र आम्हाला काश्मीरमध्ये व विशेष करुन श्रीनगरमध्ये हे मंदिर उभारायचे आहे. यासंदर्भातील रितसर विनंती पंतप्रधान कार्यालयात पाठवण्यात आली आहे.
इस्कॉन जम्मू काश्मीरमध्ये मंदिर उभारणार
