वॉशिंग्टन – जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी चंद्र आणि मंगळावर मानव पाठविण्याचे स्वप्न पाहिले होते.ते स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू केले होते.त्याचा अंतिम क्षण काल आला होता.मस्क यांची ‘स्टारशिप ‘ मोहीम काल सोमवारी सुरू होणार होती.मात्र या ‘स्टारशिप ‘ मोहिमेचे प्रक्षेपण लांबणीवर पडले आहे.या ‘स्टारशिप ‘चा मोहिमेतील प्रेशर वॉल्व गोठल्याने ही मोहीम स्थगित करावी लागली आहे.
आता प्रेशर वॉल्व कार्यान्वित होत नाही तोपर्यंत हे प्रक्षेपण होणार नाही.
दरम्यान, प्रक्षेपण होणार नाही असे ट्विट इलॉन मस्क यांनी केले होते. स्टेनलेस स्टीलने तयार करण्यात आलेले हे स्टारशिप आहे. मस्कच्या स्पेस एक्स कंपनीने हे तयार केले आहे. स्टारशिप आपल्या पहिल्या ऑर्बिटल टेस्ट फ्लाइटसाठी काल सोमवारी सज्ज झाले होते. सायंकाळी ५.३० वाजता ते अवकाशात झेपावणार होते.स्टारशिप ट्रान्सपोर्टेशन सिस्टम जवळपास ४० मजली इमारतीएवढे उंच आहे. ते आपल्यासोबत १५० मेट्रिक टन वजन पेलू शकते.या यानाच्या माध्यमातूनच मानव एका ग्रहाहून दुसऱ्या ग्रहावर जाणार आहे. इलॉन मस्क यांची २०२९ पर्यंत मंगळावर मानवी वस्ती वसवण्याची इच्छा आहे. हे यान मानवाला एका तासाच्या आत जगातील कोणत्याही कोपऱ्यात घेऊन जाण्यासही सक्षम आहे.