इराणमध्ये एकाच दिवशी २९ जणांना फाशी

तेहरान- इराण सरकारच्या आदेशानंतर एकाच दिवसात २९ जणांना फाशी दिली आहे. बुधवारी ८ ऑगस्ट रोजी तेहरानच्या तुरुंगात २६ जणांना तर करज शहरातील तुरुंगात ३ जणांना फाशी दिली आहे. एएफपीच्या वृत्तानुसार मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांपैकी दोघे अफगाण नागरिक आहेत. या सर्वांवर अंमली पदार्थांची तस्करी, खून आणि बलात्कारासह अनेक गंभीर आरोप आहेत. यूएस-आधारित मानवाधिकार कार्यकर्ते न्यूज एजन्सी (एचआरएएनए) आणि इराणमधील मानवाधिकार केंद्र (सीएचआरआय) ने गेजलहसार तुरुंगात किमान दोन डझन लोकांना फाशी दिल्याचे सांगितले. इराणशी निगडीत मानवाधिकार संघटनाचे संचालक महमूद अमीरी मोगद्दम म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदाय याकडे फारसे लक्ष देत नाही. इराणवर कोणताही दबाव नाही, यामुळे इराण सरकार येत्या महिनाभरात शेकडो लोकांना फाशी देऊ शकते. ते म्हणाले की, २००९ नंतर एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने लोकांना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इराणमध्ये सातत्याने फाशीची शिक्षा दिली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १८ मे रोजी दोन महिलांसह सात जणांना फाशी देण्यात आली होती. हे सर्व लोक अंमली पदार्थांच्या तस्करीत दोषी होते. काही लोकांचे मत आहे की इराण लोकांमध्ये भीती निर्माण करत आहे, जेणेकरून सरकारचा निषेध होऊ नये. यामुळे इराणने फाशीची शिक्षा आणखी कडक केली आहे. एका अहवालानुसार, २०२२ नंतर ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्यापैकी बहुतेक ते सरकारविरोधात आंदोलन करणारे होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top