कराची
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान हरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना न्यायालायने दिलासा दिला. एटीसीने खान यांच्याविरुद्ध दाखल केल्या आठ गुन्ह्यांमध्ये त्यांचा अंतरिम जामीन वाढवला. याचवेळी अलकादिर ट्रस्ट प्रकरणात त्यांच्या पत्नीला अंतरिम जामीन देण्यात आला.
इम्रान या प्रकरणी याचिका दाखल करण्यासाठी रावळपिंडी कार्यालयात गेले होते. या प्रकरणांची सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा देत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली. न्यायालयाने इम्रान यांना ८ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान यांची पत्नी बुशरा यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. बुशरा यांच्या विरोधात १९० दशलक्ष पाउंडच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी इम्रान आणि त्यांची पत्नी इस्लामाबाद न्यायिक संकुलात गेले होते. जिथे न्यायालयाने अल कादिर ट्रस्ट प्रकरणाची सुनावणी केली. त्यानंतर बुशराला ३१ मे पर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले. यासोबतच ५ लाख रुपयांचे जामीन रक्कम जमा करण्याचे आदेश दिले.