इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बुशरा बीबी तब्बल २६५ दिवसांनंतर रावळपिंडी येथील आदियाला कारागृहातून बाहेर आल्या आहेत.
बुशरा बीबी यांना गेल्या वर्षी ३१ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. सत्तेवर असताना सरकारी तिजोरीतील मालमत्ता विकण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी न्यायालयाने त्यांना १४ वर्षाची शिक्षा सुनावली होती. काल त्यांना १० लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना न्यायालयातूनच घरी सोडण्यात आले.