मिलान-नववर्षाच्या सुरुवातीला आज इटलीच्या मिलान शहराने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी घातली आहे.मिलानचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीच्या ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मिलान ही इटलीची आर्थिक व फॅशनची राजधानी आहे. या शहरातील पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी तसेच वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना त्यासाठी ४० ते २४० युरो इतका दंड भरावा लागणार आहे. मात्र आपल्या घराच्या बाहेर धुम्रपान करणाऱ्यांवर हा दंड आकारण्यात येणार नाही. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यामुळे पॅसिव्ह स्मोकिंगचा धोका टळेल असे म्हटले आहे तर काहींनी याला प्रशासनाची सक्ती असल्याचे म्हटले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |