इक्बाल चहल यांची गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई- इक्बाल चहल यांची गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. इक्बाल चहल यांच्याकडे सध्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार होता. आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभारदेखील चहल यांच्याकडे सोपवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top