इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक
आकाशात लाव्हा आणि राखेचे ढग!

जकार्ता – इंडोनेशियात जगातील सर्वात सक्रिय समजला जाणारा माऊंट मेरापी ज्वालामुखी फुटला असून त्याच्या उद्रेकामुळे आकाशात तप्त लाव्हा आणि राखेचे ढग पसरले होते.परिसरातील सर्व गावांमध्ये जणू राखेचा पाऊस पडत होता.त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

ज्वालामुखीच्या स्फोटातील निर्माण झालेली राख आकाशात ७ किलोमीटर उंचीवर गोल गोल फिरताना दिसत होती.या ज्वालामुखीची उंची ९७३७ फुट इतकी आहे. या ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा रस डोंगर रांगांमधून खाली प्रवाहित होताना दिसत होता.काल शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही ज्वालामुखी फुटण्याची घटना घडली आहे. राखेमुळे नागरिकांना श्वास घ्यायला मोठा त्रास होत होता. या घटनेत नुकसानीचा अंदाज लावणे कठिण असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Scroll to Top