इंडोनेशियात इंधन डेपोला भीषण
आग; १४ जणांचा मृत्यू, १२ जखमी

जकार्ता

इंडोनेशियात एका इंधन डेपोला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा जळून मृत्यू झाला. तर, १२ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरु केले.

इंडोनेशियातील सरकारी इंधन आणि गॅस कंपनी असलेल्या ‘पर्टामिना’च्या डेपोत ही घटना घडली. या डेपोतून संपूर्ण इंडोनेशियाला सुमारे २५ टक्के इंधनाचा पुरवठा केला जातो. उत्तर जकार्ताजवळील तनाह मेराह या दाट लोकवस्तीजवळ हा डेपो आहे. सदर घटनेनंतर शेकडो लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. आग मोठी असल्याने आगीचे लोट निघत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १८० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ३७ फायर इंजिन्स तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.

Scroll to Top