इंडोनेशियात आयफोन-१६ वरीलबंदीमुळे विदेशी पर्यटकांमध्ये गोंधळ

बोर्नियो द्विप (इंडोनेशिया) – इंडोनेशियाच्या सरकारने अचानक अॅपल कंपनीच्या आयफोन-१६ बंदी लागू केली आहे.देशात आयफोन-१६ वापरणे बेकायदेशीर ठरविले जाईल, असा सज्जड इशारा सरकारने दिला आहे. त्यामुळे आधीच इंडोनेशियामध्ये आलेल्या पर्यटकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे.उद्योगमंत्री अगस गुमिवांग कर्तसास्मिता यांनी याबाबतची घोषणा केली आहे. देशात कोणीही आयफोनची विक्री करताना किंवा त्याचा वापर करताना आढळल्यास त्या व्यक्तीवर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल,असे कर्तसास्मिता यांनी सांगितले.आयफोन-१६ या मोबाईल फोनला ‘इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी’ (आयएमईआय) नंबर नसतो. देशात मोबाईल वापरण्यासाठी हा आयएमईआय नंबर असणे बंधनकारक आहे. त्यामुळे देशाच्या धोरणाशी सुसंगत नसलेल्या आयफोन -१६ वर बंदी घालण्यात आली आहे,असे कर्तसास्मिता यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top