नवी दिल्ली- इंडिगो एअरलाइन्सच्या तिकीट बुकिंग प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे लोकांना आज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.स्लो नेटवर्कमुळे आणि सर्व्हर डाऊन झाल्याने बुकिंग प्रणालीसह वेबसाईटवर परिणाम झाला.त्यामुळे देशभरातील विमानतळावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
इंडिगो विमान कंपनीची बुकिंग प्रणाली आज दुपारी १२ वाजता डाउन होऊ लागली आणि त्यानंतर एक तासानंतर १ वाजण्याच्या सुमारास ती व्यवस्थित काम करू लागली.या एक तासात देशभरातील विमानतळांवर सेवा ठप्प झाली.तांत्रिक बिघाडामुळे अनेक प्रवाशांची उड्डाणे चुकली आणि अनेकांना तिकीट काढता आले नाही. यासोबतच विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या.त्रासलेल्या प्रवाशांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आणि डीजीसीएने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.