आसाराम बापू जेलमधून बाहेर खोपोलीतील रुग्णालयात उपचार

रायगड – अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. राजस्थान हायकोर्टाने १३ ऑगस्टला आसाराम बापूला उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर २ आठवड्यांनंतर त्याला रायगडच्या खोपोली येथील रुग्णालयात हृदयाच्या संबंधित उपचारासाठी आणले.पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या आसाराम बापूला रात्री ८ वाजता खोपोलीच्या आयुर्वेदिक रुग्णालयाच्या बहुविद्याशाखीय कार्डियाक केअर क्लिनिकमध्ये पोलीस बंदोबस्तात आणले. पुढील ७ दिवस त्याच्यावर हृदयविकारावर या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे.

दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी हायकोर्टाने आसाराम बापूला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्याच्यासोबत प्रवासात ४ पोलीस असतील आणि त्याच्यासोबत दोन मदतनीस ठेवण्याची परवानगीही दिली होती. त्यांना पुण्यातील एका खासगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार, वाहतूक आणि पोलिस बंदोबस्ताचा संपूर्ण खर्च त्यांनाच करावा लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top