आसनगाव स्थानकात तांत्रिक बिघाडीने मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई – मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकात आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे आसनगाववरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवरुन आसनगावाकडे जाणाऱ्या लोकल गाड्या १ तास उशिराने धावत होत्या. रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवर गर्दी झाली. सुदैवाने हा तांत्रिक बिघाड लगेच दुरुस्त करण्यात आला आणि लोकल सेवा पूर्ववत झाली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top