पुणे – आळंदीत पुन्हा एकदा इंद्रायणी नदी रसायन युक्त पाण्याने फेसाळली आहे. आजूबाजूला असणाऱ्या कंपन्या, त्यातून नदीत सोडले जाणारे रासायन यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे.
अनेक महिन्यापासून आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याबाबत आवाहन केले जात आहे. काही राजकीय पक्षांनी इंद्रायणी नदी काठावर आंदोलनही केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचा आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रशासनामार्फत काही पावले उचलण्यात आली. मात्र तरीही इंद्रायणी नदीची अवस्था बिकट आहे.