आर्थिक व्यवहार आले की, परराष्ट्र मंत्री पाकलाही जाणार

नवी दिल्ली- परराष्ट्र मंत्री एस जयशंकर १५ व १६ ऑक्टोबरला पाकिस्तानला भेट देणार आहेत. ते इस्लामाबादमध्ये एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन)च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटच्या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तान या बैठकीचे यजमान आहेत. ९ वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय मंत्री पाकिस्तानला भेट देणार आहेत.”
काहीच दिवसांपूर्वी जयशंकर यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याचे दिवस संपले असे म्हटले होते. मात्र, आर्थिक संबंध सुधारण्यासाठी ते पाकिस्तानला भेट देत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांच्या दौर्याबाबत जयस्वाल यांना विचारले असता, ते म्हणाले की भारत एससीओ सनदेसाठी वचनबद्ध आहे. जयशंकर यांच्या भेटीचे हे कारण आहे. यावरून दुसरा अर्थ काढू नये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top