आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक

अहमदाबाद :- आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमध्ये ईडी युनिटने अटक केली आहे.

अनिल जयसिंघानी यांच्यावर १० हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात समावेश असल्याचा आरोप आहे. ईडीकडून अहमदाबाद कोर्टात सुरू असलेल्या २०१५ मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जयसिंघानी याची चौकशी सुरु होती. चौकशी सुरू असताना ईडीने मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यातून जयसिंघानी याला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर न्यायालयात जयसिंघानी यांच्या कोठडीची मागणी केली आहे. दरम्यान, जयसिंघानी हा मुंबईजवळील उल्हासनगरचा असून तो १५ हून अधिक प्रकरणांमध्ये संशयित आहे. याशिवाय सट्टेबाजी प्रकरणात त्याला तीन वेळा अटक झाली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जयसिंघानी यांच्या मुलीविरोधात लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात बेकायदेशीर अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने शुक्रवारी याचिका फेटाळून लावली.

Scroll to Top