मुंबई – इंडियन प्रिमियर लिगमधील (आयपीएल)एका क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व घेणाऱ्या ड्रीम इलेव्हन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह संस्थापक हर्ष आनंद जैन यांनी मुंबईतील मलबार हिलच्या उच्चभ्रू वस्तीतील एका इमारतीतील फ्लॅट तब्बल १३८ कोटी ४० लाख रुपयांना खरेदी केला आहे.९ जानेवारी २०२५ रोजी या व्यवहाराची कायदेशीर नोंदणी झाली आहे. १३८ कोटींच्या या फ्लॅटची ८.३ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी सरकार दफ्तरी भरण्यात आली आहे.लोढा मलबार या इमारतीच्या संकुलातील टॉवर ए मधली हा फ्लॅट ९ हजार ५४६ चौरस फुटाचा आहे.त्याची प्रति चौरस फूट किंमत १ लाख ४५ हजार आहे.
आयपीएल टीम विकत घेणाऱ्या ड्रिम इलेव्हनचा १३८ कोटींचा फ्लॅट
