मुंबई – माहिती तंत्रज्ञान आणि सीमेंट निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या खरेदीच्या बळावर आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०७ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५३.५० अंकांनी वधारला. मागील काही सत्रांतील विक्रीच्या दबावातून आज शेअर बाजार बाहेर आला.निफ्टी दिवसाअखेरीस २३,२०५ अंकांवर तर सेन्सेक्स ७६,५१२ अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप-१०० निर्देशांक १.८६ टक्क्यांच्या उसळीसह ५४,०९८ अंकावर तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक १.१२ टक्क्यांच्या वाढीसह १७,३६४ अंकांवर स्थिरावला.
आयटी,सिमेंट क्षेत्राचे बळ शेअर बाजार तेजीसह बंद
