आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा

नवी दिल्ली- भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर ७,८०० चौरस फूटाचा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला.

या चमूचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन जय किशन यांनी केले. दिव्यांग उदयकुमार आणि इतरांचा समावेश असणाऱ्या या चमूने कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान ते किलिमंजारो मोहीम (मिशन के २ के) हाती घेतली आणि या मोहिमेत पहिल्यांदाच एका दिव्यांग गिर्यारोहकाने कुबड्या वापरून गिर्यारोहण केले.या चमूने त्यांचा प्रवास बेस कॅम्प पासून सुरू केला आणि १५,५०० फूट उंचीवरील कीबू हट इथे ७ ऑगस्ट रोजी पोहोचले. तिथे त्यांनी ७,८०० चौरस फुटाचा राष्ट्रीय ध्वज जमीनीवर जाळे,दोर आणि खिळ्यांच्या सहाय्याने उभा केला .

हवामानाची स्थिती व सर्व सहभागींची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन चमूने उहुरू शिखराकडे ८ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता प्रयाण केले. वादळी वातावरणात निसरड्या मार्गावर पर्वतीय भागात ८५ अंश सरळ अशी कष्टदायक दहा तासांची चढाई करत त्यांनी दुपारी एक वाजता ५,८९५ मीटर उंचीवरील (१९,३४१ फूट) उहूरू शिखर गाठले आणि किलीमंजारो पर्वतावरील उहूरू शिखरावर भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top