मुंबई – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला यांच्यावर दिल्लीतील साकेत न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. आफताबविरोधात श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. दरम्यान, न्यायालयाने आज मंगळवारी आफताबवर खून आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप निश्चित केले आहेत. खटल्याची पुढील सुनावणी 1 जून पासून सुरू होणार आहे. साकेत न्यायालयाने आरोपी आफताब अमीन पूनावाला यांच्यावर खून (कलम 302) आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी (कलम 201) आरोप निश्चित केले आहेत.सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी पुरेसे पुरावे सादर केले आहेत, त्यामुळे प्रथमदर्शनी हत्येचा कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुरावे नष्ट केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान आरोपी आफताबने आपल्यावर लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. या खटल्याला आव्हान देणार असल्याचे आफताबने सांगितले आहे.
आफताबवर अखेर आरोप निश्चित
