ठाणे – रक्षाबंधन तोंडावर येऊन ठेपले आहे. लाडक्या बहिणी आपल्या भावाच्या हातावर शोभणारी सुंदर राखी घेण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजू लागल्याने या उत्सवावर आता राजकीय प्रभाव पडलेला आहे. ठाण्यात लाडकी बहीण योजनेचा पूर्ण फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हावा यासाठी एका दुकानात ‘आपले सरकार शिंदे सरकार’असे म्हटले की मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली राखी फूकट देण्यात येते. आत्तापर्यंत सुमारे 5 हजार राख्या अशा प्रकारे फूकट देण्यात आलेल्या आहेत . लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी अशा प्रकारे फुकट राखी वाटण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे ठाण्यातील वामाक्षी या दुकानच्या मालक कल्पना गांगर यांनी नवाकाळ ला सांगितले. ..धर्मवीर आनंद दिघे हयात असताना ठाण्यात आनंद आश्रमात मोठ्या प्रमाणावर रक्षाबंधन सण साजरा व्हायचा, दूर दूर वरून अनेक महिला दिघे यांना राखी बांधण्यासाठी आनंदाश्रमात यायच्या, रांगा लागायच्या, दिघे यांच्या मृत्युंनंतर ही प्रथा बंद पडली, पण या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेनंतर बहिणीने देखील मुख्यमंत्र्यांना लाडका भाऊ मानत राखी बांधावी असा या मागचा उद्देश आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |