आपच्या नव्या पोस्टरवर सर्वच विरोधी बेईमान

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आता चांगलेच रंग भरले जात असून प्रमुख तीन्ही पक्ष एकमेकांवर चांगलीच टीकेची झोड उठवत आहेत. भाजपाने केजरीवाल यांच्या शिशमहलचा मुद्दा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला असून आपने भाजपाच्या खोटेपणावर प्रहार केले आहेत. आज आपने जारी केलेल्या एका पोस्टवर मोदी व राहुल गांधी या दोघांनाही बेईमान म्हटले आहे.
आम आदमी पार्टीने आपल्या एक्स माध्यमावर या नव्या पोस्टरचा फोटोही टाकला आहे.

एक अकेला पडेगा सब पर भारी असे शिर्षक त्याला दिले आहे. या पोस्टमध्ये अरविंद केजरीवाल यांचाच फोटो रंगीत आहे. ते एका मिरवणूकीत चालताना दिसत आहेत. त्याच्या खालोखाल केजरीवाल की ईमानदारी सारे बेईमानों पर पडेगी भारी अशी ओळ लिहिली आहे. त्या खाली अनेक नेत्यांचे फोटो टाकले असून पहिल्याच रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गाधी, योगी आदित्यनाथ, अनुराग ठाकूर आदी नेत्यांचे फोटो टाकले आहेत. या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर केवळ अरविंद केजरीवाल हेच इमानदार असून इतर सर्व नेते बेईमान असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आपने केला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांनीही उत्तर दिले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या पोस्टमध्ये राहुल गांधी यांच्या फोटोने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपाच्या विरोधात लढले होते. आता दोन्ही पक्ष एकमेकांबरोबर लढत आहेत. त्याचा भाजपाला कितपत फायदा होतो ते आता पाहावे लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top