मुंबई- दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टळून राज्यातील महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
आपने हरियाणा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपाचा मोठा फायदा झाला होता. याचे इंडिया आघाडीत तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आपने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेत या दोन्ही राज्यांतील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार आहे. आपच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्या मतांची विभागणी टळून त्याचा थेट फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.