नवी दिल्ली – ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची आज दिल्लीत पुन्हा भेट झाली.
24 फेब्रुवारीला केजरीवाल यांनी मुंबईत येऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर लागलीच साडेतीन महिन्यांनी पुन्हा भेट झाल्याने विरोधकांची मोट बांधण्याचे काम प्रगतीपथावर असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी आज ट्वीट करत माहिती दिली. ते म्हणाले की, ‘आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमच्यासोबत खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि संजय सिंह उपस्थित होते. लोकशाही आणि आपली राज्यघटना धोक्यात आहे आणि जमेल त्या मार्गाने आपण त्यांचे संरक्षण केले पाहिजे’.
आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली केजरीवालांची भेट
