मुंबई- ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे १६ जुलैपासून विधानसभा निहाय दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून आता विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाने आता मिशन विधानसभा हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत. ह्या दौऱ्याची सुरुवात कर्जत आणि उरण विधानसभेपासून होणार आहे. त्यावेळी ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.