पुणे
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात रोड शो करणार आहेत . महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत. काल काँग्रेसचे प्रचारप्रमुख मोहन जोशी यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. या भेटीवेळी आदित्य ठाकरेंच्या रोड शो बाबत आणि धंगेकर यांच्या प्रचाराबाबत चर्चा करण्यात आली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात आदित्य ठाकरेंच्या रोड शोचे आयोजन केले जाणार आहे.