आदित्य एल-१चे मोठे यश वैज्ञानिक डेटा गोळा करणे सुरू

नवी दिल्ली- भारताची सूर्यमोहीम असलेल्या आदित्य एल-१ मंगळवारी पाचव्यांदा आपली कक्षा बदलणार आहे. त्याआधी या यानाने वैज्ञानिक डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे.
इस्रोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आदित्य एल-१ ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याने शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे.
आदित्य-एल १ मध्ये स्थापित केलेल्या ‘ स्टेप्स ‘ उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५० हजार किमी पेक्षा जास्त अंतरावर सुपर-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजणे सुरू केले आहे. हे अंतर पृथ्वीच्या त्रिज्येच्या ८ पट जास्त आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top