बंगळुरू- देशाची पहिली सौर मोहीम आदित्य एल-१ ने पृथ्वीची तिसरी कक्षा यशस्वीरित्या पार केली आहे. आदित्य एल-१ आता २९६ किमी x ७१७६७ किमी कक्षेत फिरत आहे. पुढील कक्षा बदलण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार असल्याची माहिती इस्रोने एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली आहे.
यापूर्वी आदित्य एल-१ ने पृथ्वीची पहिली कक्षा ३ सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पार पडली होती. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ ने दुसरी कक्षा पार केली होती. आता या सूर्ययानाने आज तिसरी कक्षा यशस्वीरित्या बदलून चौथ्या कक्षेतील मार्गक्रमणाला सुरूवात केली आहे. हे यान १५ सप्टेंबर रोजी चौथी कक्षा पूर्ण करत पाचव्या कक्षेत प्रवेश करणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.
‘आदित्य एल १’चा पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश
