नवी दिल्ली – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. या भेटीचा फोटो पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर शेअर केला.त्यानंतर आतिशी यांनीही फोटो शेअर करत पोस्ट केली की,’आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिल्लीच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी अपेक्षा मी करते.’आतिशी यांनी २१ सप्टेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासह त्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला आहेत.
आतिशी यांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट
