आता २० किमी पर्यंतचाप्रवास ‘ टोल फ्री ‘ होणार

नवी दिल्ली- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहनधारकांच्या सुलभ प्रवासासाठी नवीन टोल प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी टोल भरावा लागणार नाही.मात्र यासाठी तुमच्या गाडीमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) बसवून घेणे आवश्यक आहे.जीएनएसएस ही एक प्रकारची उपग्रह प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे वाहनाच्या स्थान आणि वाहनाने केलेला प्रवास याची माहिती मिळते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ मध्ये बदलांची अधिसूचना जारी केली आहे.त्यानुसार ही नवी टोल प्रमाणी लागू करण्यात आली आहे. मात्र वाहनाने २० किमीपेक्षा जास्त अंतर कापले तर त्याच्याकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही हायवेवर ३० किलोमीटरचा प्रवास केला तर २० किलोमीटरपर्यंतचा प्रवास टोल फ्री असेल आणि तुमच्याकडून फक्त १० किलोमीटरसाठीच टोल शुल्क आकारले जाईल.या नियमामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top