आता सरकारी बंगला सोडल्यांनंतर
राहूल गांधी आईच्या घरी राहणार

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षांचे लोकसभा सदस्यत्व संपल्यानंतर राहुल गांधी यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली होती. त्यांनतर आता सरकारी बंगला सोडल्यानंतर राहुल गांधी त्यांची आई सोनिया गांधींच्या घरी १० जनपथ येथे शिफ्ट होत आहेत. त्यांचे सामान हलवले जात आहे. ते लवकरच येथे राहायला जाणार आहेत.

२७ मार्च रोजी लोकसभा गृहनिर्माण समितीने राहुल यांना १२ तुघलक रोड येथील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस पाठवली होती. बंगला रिकामा करण्यासाठी २४ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुल यांनी लोकसभा सचिवालयाचे उपसचिव डॉ. मोहित रंजन यांना लेखी उत्तर पाठवले. त्यात त्यांनी म्हटले, मी ४ वेळा लोकसभेचा खासदार निवडून आलो. हा जनतेचा जनादेश आहे, त्यासाठी मी जनतेचा आभारी आहे. या घराशी माझ्या अनेक चांगल्या आठवणी जोडलेल्या आहेत. नोटीसमध्ये दिलेल्या आदेशाचे मी पालन करीन. हा बंगला २००५ मध्ये राहुल यांना देण्यात आला होता, जेव्हा ते २००४ मध्ये पहिल्यांदा अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले होते.

राहुल गांधी यांच्या या पत्रानंतर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राहुल यांना घर देण्याची ऑफर दिली होती. यामध्ये पहिले नाव होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे. ते म्हणाले जर राहुल यांना हवे असेल तर ते त्यांच्या आईसोबत राहू शकतात, असा सल्ला देताना त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी राहण्याची देखील मी त्यांची व्यवस्थ करेन असे म्हटले होते.

Scroll to Top