मुंबई – मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा निर्णय घ्यावा याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे .मॅक चीज बर्गर आणि मॅक आलू टिक्की या दोन पदार्थांमध्ये कांदा आणि लसूण नसेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.मात्र, मॅकडोनाल्डच्या श्रावण स्पेशल बर्गरवर सोशल मीडियावर टीका होत आहे. श्रावणात फास्ट फूड खाणे हे त्या पवित्र महिन्याच्या भावनेच्या विरोधात आहे. श्रावण महिन्याला हिंदू संस्कृतीमध्ये मोठे महत्त्व आहे.
आता मॅकडोनाल्डचाही श्रावण स्पेशल बर्गर
