आता मुंबई मेट्रोचे तिकीट व्हॉट्सॲपवर काढता येणार

मुंबई – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ म्हणजेच
‘एमएमएमओसीएल’ ने ‘मेट्रो २ अ’ आणि मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवाशांसाठी आता नवीन सुविधा सुरू केली आहे.आता प्रवाशांना अधिक सोप्या पद्धतीने तिकीट उपलब्ध करण्यासाठी व्हॉट्सॲपची मदत घेण्यात येणार आहे.

‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील गुंदवली मेट्रो स्थानकात काल शुक्रवारी मेट्रोचे तिकीट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करण्याची सेवा महिला प्रवाशांच्या हस्ते सुरू करण्यात आली.मेट्रो प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये यासाठी ‘एमएमएमओसीएल’ने तिकिटाचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ‘एमएमएमओसीएल’च्या ॲपवरून तिकीट काढता येते. यापुढे ॲपचा वापर न करता प्रवाशांना मेट्रोचे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी ‘एमएमएमओसीएल’ने व्हॉट्सॲप तिकिटाचा पर्याय उपलब्ध केला आहे. प्रवाशांसाठी ही सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली.या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना ८६५२६३५५०० या व्हॉट्स ॲप क्रमांकावर ‘Hi’ असे लिहून पाठवून किंवा स्थानकांवरील क्यूआर कोड स्कॅन करून संभाषणात्मक यंत्रणेच्या (कन्व्हर्सेशनल इंटरफेस) माध्यमातून तिकीट खरेदी करता येणार आहे. यासाठी डेबिट कार्ड वा क्रेडिट कार्डद्वारे तिकिटाची रक्कम अदा करता येणार आहे. या सेवेमुळे तिकीट जलद उपलब्ध होणार असून प्रवाशांसाठी मोठी सोय होईल, असा दावा ‘एमएमएमओसीएल’कडून करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top