कोची – आता भारतात आगळीवेगळी मेट्रो ट्रेन धावणार आहे ही मेट्रो इतर मेट्रोपेक्षा फार वेगळी आहे. कारण ही मेट्रो ट्रॅकवर नाही तर पाण्यात धावणार आहे. या अंडर वॉटर मेट्रोचे
उद्घाटन केरळमधील कोची येथे २५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही मेट्रो कोचीमधील विविध स्थळांना जोडली जाणार आहे.
बंदरगाह शहरात ११३६ कोटी रुपये खर्च करून ही मेट्रो तयार करण्यात आली आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या मेट्रोला राज्याचे ‘ड्रिम प्रोजेक्ट’ म्हटले आहे.कोची हे केरळमधील दाट लोकवस्तीचे शहर आहे. येथील दाट लोकवस्तीच्या शहरात गर्दी कमी करण्यासाठी आणि कोचीच्या किनाऱ्यावर सहज पोहचण्यासाठी वाहतुकीची ही नवी संकल्पना साकार करण्यात आली आहे.
पाण्यातील मेट्रोचा हा मार्ग ७८ किलोमीटरचा आहे. या मार्गावर १५ स्थानके आहेत. ही संकल्पना आधुनिक, पर्यावरण पूरक तसेच प्रवाशांना सुखद अनुभव देणारी असणार आहे.प्रवासी कोची- १ कार्डाचा वापर करून कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रो या दोन्हीमध्ये प्रवास करू शकतील. डिजिटल स्वरुपात देखील याचे तिकीट काढता येईल. कोची वॉटर मेट्रोमुळे एक लाखापेक्षा जास्त लोकांना फायदा होण्यास मदत होईल.कोची वॉटर मेट्रोमुळे एक लाखापेक्षा जास्त लोकांना फायदा होण्यास मदत होईल.