धुळे- नाशिकसह कांदा पट्ट्यात चोरीच्या घटना घडत आहेत. आता धुळे जिल्ह्यातही अशीच घटना घडली आहे.साक्री तालुक्यातील सामोडे येथील चोरट्यांनी गोदाम फोडून दोन लाख रुपये किमतीचा ४९ क्विंटल कांदा लंपास केल्याची घटना घडली.
साक्री येथील रहिवासी आणि नवापूर येथील प्राथमिक शिक्षक हर्षवर्धन सोनवणे यांच्या पत्नी स्मिता सोनवणे यांचा कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. कांदा हा सामोडे शिवारातील आशापुरी काट्याजवळ आदित्य ट्रेडिंग नावाच्या गोडाऊनमध्ये ठेवला होता. २९ आॅक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास देखरेखीचे काम करणारे अनिल वानखेडे हे जेवणासाठी घरी गेले. त्यानंतर रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे १४० गोण्यांमध्ये भरून ठेवलेला १ लाख ९६ हजार रुपये किमतीचा सुमारे ४९ क्विंटल कांदा चोरून नेला.