आता कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी वेळापत्रक लागू !

*गाड्यांचा वेग वाढणार

मडगाव- कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेचे वेळापत्रक पावसाळी व उन्हाळी अशा दोन टप्प्यात चालवले जाते. पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर ते ९ जून असे उन्हाळी हंगामातील वेळापत्रक लागू केले जाते. तर पावसाळी हंगामासाठी गाड्यांचा वेग कमी केला जातो व १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये गाड्यांचा वेग निश्चित केला जातो. त्यानुसार १ नोव्‍हेंबरपासून उन्हाळी हंगामातील वेळापत्रक लागू करण्‍यात आले. त्यामुळे पावसाळ्यात कमी झालेला गाड्यांचा वेग आता वाढणार आहे.

उन्हाळी वेळापत्रकानुसार गाड्यांचा वेग ताशी १३० ते १६० किमी राहील. यामुळे या मार्गावर वेगवान गतीने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटांमध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. तर तेजस एक्सप्रेस ९ तास १० मिनिटांमध्ये मडगावला पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस ही ९ तास २० मिनिटांमध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.कोकण कन्या एक्सप्रेस मडगाव येथून सायंकाळी ७ सुटून सावंतवाडीला ८.३८ वाजता, कुडाळ ९ वाजता, सिंधुदुर्गनगरी ९.१४ वाजता, कणकवली ९.३० वाजता आणि वैभववाडीला ९.५६ वाजता सुटून मुंबई सीएसटीला पहाटे ५.४० वाजता पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी ३.०५ वाजता सुटून सावंतवाडीला दुपारी ४.२४ वाजता, कुडाळ ४.४२ वाजता,
कणकवली ५.०४ वाजता येणार आहे.वंदे भारत एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटून कणकवलीला सायंकाळी ४.२० वाजता येणार आहे. मांडवी एक्सप्रेस मडगाव येथून सकाळी ९.१५ वाजता सुटून सावंतवाडीला १०.४२ वाजता, कुडाळ ११.४ वाजता, सिंधुदुर्गनगरी ११.१७ वाजता, कणकवली ११.३२ वाजता तर वैभववाडीला ११.५८ वाजता येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top