आणखी एक नवी विमान कंपनीस्वस्तात करता येणार प्रवास

दुबई-एअर केरळ या नव्या एअरलाइन कंपनीला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. एअर केरळने दुबईत ही घोषणा केली आहे. या एअरलाईन्सद्वारे स्वस्तात प्रवास करता येणार आहे.केंद्र सरकारकडून एनओसी मिळाल्यानंतर एअर केरळने २०२५ मध्ये आपली सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सुरुवातीला एअर केरळ कंपनी तीन एटीआर 72-600 विमाने वापरणार आहे. देशातील लहान शहरे जोडण्याचा त्यांचा संकल्प आहे.एअर केरळ ही भारतातील दक्षिणेकडील राज्याची पहिली प्रादेशिक विमान कंपनी असेल. त्यांच्या झेटफ्लाय एव्हिएशन नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला ३ वर्षांसाठी हवाई वाहतूक सेवा चालवण्याची परवानगी मिळाली आहे. एअर केरळला दुबईचे उद्योगपती अफी अहमद आणि अयुब कल्लाडा यांचे पाठबळ लाभले आहे.केरळ सरकारने २००५ मध्ये पहिल्यांदाच एअर केरळबाबत नियोजन केले होते. एअर केरळने लहान शहरांना परवडणारी विमानसेवा देण्याची योजना आखली आहे. आता विमान खरेदी करून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आयुब कल्लाडा यांनी सांगितले. विमाने खरेदी करण्याबरोबरच ती भाडेतत्त्वावर घेण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top