नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचार्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी करुन या आयोगाच्या शिफारशी २०२६पासून लागू केल्या जाणार असल्याचे सांगितले.हा आयोग कोणत्या तारखेला लागू होणार हे मात्र स्पष्ट केले नाही.अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की,आतापर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले होते.केंद्र सरकारने ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ रोजी लागू केल्या होत्या.ज्याचा कार्यकाल ३१डिसेंबर २०२५रोजी संपणार आहे.त्यामुळे आता केंद्र सरकारने २०२५मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.या आयोगासाठी लवकरच एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली जाईल.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
