नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्ष स्वबळावर लढत असताना भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही (रिपाईं-आठवले गट) स्वबळाचा नारा दिला आहे. आठवले यांनी आपल्या १५ उमेदवारांची यादी आज जाहीर केले.
रामदास आठवले यांनी जाहीर केलेली रिपाईंच्या उमेदवारांची पहिली यादी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी आरक्षित सुलतानपूर मर्झा मतदारसंघातून लक्ष्मी, कोंडाली राखीव मतदारसंघातून आशा कांबळे, तिमारपूरमधून दीपक चावला, पालममधून वीरेंद्र तिवारी,रणजित (पतपरगंज), विजयपाल सिंह (लक्ष्मी नगर), कन्हय्या (नरेला), ताजेंदर सिंह (संगम विहार), मनिषा (सदर बाजार), राम नरेश निषाद (मालविय नगर), मंझूर अली (तुघलकाबाद), हर्षित त्यागी (बदरपूर), सचिन गुप्ता (चाँदनी चौक) आणि मनोज कश्यप (मातियारा महारल) यांचा समावेश आहे.
महत्वाची बाब म्हणजे रिपाईंने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल च्यांच्या विरोधातही उमेदवार दिला आहे. रिपाईंच्या शुभी सक्सेना नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांच्या विरोधात उभ्या आहेत.