Home / News / आझम खान यांच्या ‘हम सफर’ रिसॉर्टवर बुलडोझर फिरवला

आझम खान यांच्या ‘हम सफर’ रिसॉर्टवर बुलडोझर फिरवला

रामपूर – उत्तर प्रदेशातील सपाचे नेते आझम खान यांच्या रामपूर येथील ‘हमसफर ‘ रिसॉर्टवर सकाळी बुलडोझर फिरवण्यात आला . हे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

रामपूर – उत्तर प्रदेशातील सपाचे नेते आझम खान यांच्या रामपूर येथील ‘हमसफर ‘ रिसॉर्टवर सकाळी बुलडोझर फिरवण्यात आला . हे रिसॉर्ट आझम खान यांच्या पत्नी तंजीन फातिमा व मुलगा अब्दुल्ला यांच्या नावावर आहे.भाजप आमदार आकाश सक्सेना यांनी याबाबत तक्रार केली होती.

हे रिसॉर्ट पाडण्यासाठी प्रशासनाचे पथक सकाळी अचानक तीन बुलडोझर आणि मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले. गावातील सोसायटीच्या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्यात आले होते. सर्वप्रथम रिसॉर्टची सीमा भिंत पाडण्यात आली. त्यानंतर एक इमारत आणि एक लॉन पाडण्यात आले. रिसॉर्टच्या ३८० चौरस मीटरमध्ये हे बांधकाम केले होते. हे बांधकाम पाडण्याची प्रशासनाने नोटीस दिल्यावर तनझिन फातिमा न्यायालयात गेल्या.पण त्या कोर्टात हरल्या. दुसरीकडे आझम खान हे सध्या सीतापूर कारागृहात आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून त्यांनी या जमिनी हडप केल्या आहेत असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या