*पश्चिम मार्गांवर ब्लॉक नाही
मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र आज शनिवारी रात्री ब्लॉक घेतला जाणार असल्याने उद्या रविवारी दिवसा या मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही.
उद्या रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे.या मेगाब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०२.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.सकाळी १०.५० ते दुपारी ३ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यापुढे मुलुंड आणि माटुंगा दरम्यान थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.१५ मिनिटांनी पोहोचतील.
तसेच हार्बर मार्गावर
पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द आहेत.सीएसएमटी-वाशी भागावर विशेष लोकल असतील.ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.