मुंबई- मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार ६ ऑक्टोबर रोजी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर आज शनिवारी रात्री ११ ते उद्या रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत १० तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.
या मेगाब्लॉक काळात
मुख्य मार्गावर सीएसएमटी येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ०३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. थांब्याव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबतील.तर कळवा,मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.तसेच सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील.सीएसएमटी / दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.