Home / News / आज मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक राहणार

आज मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक राहणार

मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार १० नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार १० नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या केवळ माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मेगाब्लॉक काळात सीएसएमटीहून सकाळी १० वाजून २५ मिनिट ते दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन फास्ट मार्गावरून पुन्हा वळवण्यात येतील.
सकाळी १० वाजून ५० मिनिटे ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.मुलुंड आणि न माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि पोहोचतील.

त्याचप्रमाणे हार्बर मार्गावर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वादे दरम्यान सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते दुपारी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

Web Title:
संबंधित बातम्या
Sakinaka Manhole

Sakinaka Manhole : मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटना: शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू; पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप-अजून किती निष्पाप बळी घेणार? संजय घाडींचा अश्विनी भिडेंवर थेट रोख..