मुंबई- खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे, तसेच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची कामे उद्या शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहेत.
त्यामुळे यादिवशी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत एच-पश्चिम विभागातील वांद्रे आणि खारच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग,हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग, खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा,चुईम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग,गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतचा परिसर,पेस पाली गावठाण,पाली पठार आदी भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून चार ते पाच दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.