धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद होणार नसल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना दिलासा मिळाला आहे.
अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्याकडून ओम्बासे यांच्याकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सादर केल्यानंतर निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सचिन ओम्बासे यांनी काढले होते. या आदेशात ओम्बासे यांनी दुरुस्ती केली असून ओमराजे आणि कैलास पाटील यांच्यावर गुन्हा नोंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट झाले आहे.