आग्रा येथे हवाई दलाचे मिग- २९ विमान कोसळले

आग्रा- उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आज हवाई दलाच्या मिग- २९ विमानाने आकाशातच पेट घेतला. त्यानंतर विमान एका शेतात कोसळले. सुदैवाने पायलट आणि आणखी एका व्यक्तीने उड्या मारून आपला जीव वाचवला. विमान जमीनवर कोसळताच आग आणखी भडकली. ही दुर्घटना आगरा येथील कागारौल भागातील सोंगा गावाजवळ घडली.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर, तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी संबंधित सर्व संस्थांना सतर्क करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top