दिल्ली – कर्नाटकातील विजयामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . म्हणूनच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी करण्यासाठी काँग्रेसने २४ मी रोजी दिल्लीत सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.
कर्नाटक नंतर आता मध्य प्रदेश , राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक होणार आहेत छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसची सरकार आहेत . तर तेलंगणात बीआरएस आणि मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. या चारही राज्यांमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी तेथील पक्ष संघटना मजबूत करणे आवश्यक आहे . असे काँग्रेसला वाटतेय . म्हणूनच या चारही राज्यातील सध्याच्या स्थितीचा आढावा घरातला जाणार आहे.राजस्थानात मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. परिणामी तिथे पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे निवडणुकीपूर्वी हि गटबाजी थांबवणे आवश्यक आहे असे पक्षश्रेष्टींना वाटतेय . तर मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाचे २२ आमदार फोडून काँग्रेस सरकार पडले होते. त्यामुळे तिथेही निवडणुकीला सामोरे जाताना पक्ष संघटना मजबूत करणे आवश्यक असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे. छत्तीसगड मध्ये काँग्रेस सरकारचे काम चांगले आहे . तिथे फारशी चिंता नाही पण तेलंगणात मात्र काँग्रेसची स्थिती खूपच वाईट आहे .या सर्व पार्शवभूमीवर आगामी निवडणुकांना सामोरे जाताना काय करायला हवे यावर २४ तारखेच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.